राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरामध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड दरवाढ झाल्यामुळे महागाईनं सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीही आणण्यात आली होती. त्याचप्रमाणे केंद्र शासन हाय हाय, दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी फेकतो डोळ्यात धूळ रिकामे सिलेंडर पेटते चूल, तेल का खेल मोदी सरकार फेल, भाजप की नियत झूठी है-महंगाई फिरसे लौटी है, सिलेंडर हुआ आठसो पार कहा हो मोदी सरकार, हररोज किमत बढाओगे-अच्छे दिन कब लाओगे, वाह रे मोदी तेरा खेल-महंगा डिझेल महंगा तेल अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसंच या घोषणांचे फलकही आंदोलनकर्त्यांच्या हातात झळकत होते. या आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी मोदींचे मुखवटे घालून रिकामा सिलेंडर उचलत महागाईचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यात बसून चुलीवर भाक-या भाजत या दरवाढीचा निषेध केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading