दिवाळी सणाचे निकष कसे ठरवतात याची दा कृ सोमण यांनी दिली माहिती

दिवाळी सणाचे दिवस ठरवले जातात, त्याच्या मागे काय निकष असतो याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more

सर्वपित्री अमावास्या अशुभ नाही – दा. कृ. सोमण

25 सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी श्रद्धेने पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा दिवस अशुभ कसा असू शकेल ? हा दिवस वाईट कसा असेल ? पितर जर भूलोकात येत असतील तर त्यांचा आशीर्वादच मिळेल ना ? पण जर जिवंतपणी त्याना त्रास दिला असेल तर मात्र ते सोडणार नाहीत. मात्र असे त्रास देणारे कमी लोक असतात. सारासार विचार केला की लक्षात येते की सर्वपित्री अमावास्या ही अशुभ नसते असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

आकाशातले ग्रह-तारे माणसांचं जीवन घडवत- बिघडवत नाहीत – दा. कृ. सोमण.

आकाशातले ग्रह-तारे माणसांचं जीवन घडवत- बिघडवत नाहीत तर माणसांच्या जीवनातील आग्रह, दुराग्रह, पूर्वग्रह हे माणसाचं जीवन घडवत-बिघडवत असतात असे विचार खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

Read more

यंदा पाऊस चांगला परंतू काही भागात अनियमित पडेल – दा कृ सोमण

वेधशाळा अस्तित्त्वात येण्यापूर्वीपासून आपल्याकडील पंचांगात पावसाचा अंदाज दिलेला असतो. 
हा अंदाज प्राचीनकाळी सांगितलेल्या नियमांवर आधारित असतो. यावरून यावर्षी पाऊस चांगला परंतू काही भागात अनियमित पडेल असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यानी सांगितले.
हे अंदाज हे ठोकताळे असतात म्हणून शेतकरीवर्गाने केवळ पंचांगातील पर्जन्य अंदाजावर अवलंबून न राहता आधुनिक वेघशाळा नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपग्रहामार्फत  घेतलेली ढगांची छायाचित्रे, हवेचा दाब, वा-याची दिशा इत्यादी गोष्टीद्वारे जे पर्जन्य अंदाज प्रसिद्ध करतात त्यानुसार आपले शेतकामाचे वेळापत्रक तयार करावे असे स्पष्ट मत सोमण यांनी व्यक्त केले.
     यावर्षीचा सूर्याचा पर्जन्य नक्षत्र प्रवेश  व वाहने पुढील प्रमाणे आहेत. घोडा वाहन असता डोंगर भागात पाऊस चांगला पडतो. कोल्हा व मेंढा वाहन असता पाऊस पडत नाही. मोर, गाढव आणि उंदीर वाहन असता अल्पवृष्टी होते.बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता खूप पर्जन्यवृष्टी होते असे सांगण्यात आले आहे.वाहने ठरविण्याचा नियमही श्री. सोमण यांनी सांगितला. “ सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्र संख्या मोजावी. या संख्येस ९ ने भागावे. शून्य बाकी राहिली तर हत्ती, १ घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा, ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस आणि ८ बाकी राहिली तर गाढव वाहने समजली जातात.”
         तसेच शेतकरीबंधूनी अनुभवांप्रमाणे पर्जन्य नक्षत्रांना दिलेली गमतीशीर नावेही श्री. दा. कृ.सोमण यांनी दिली आहेत. 
१) मृग- बुधवार, ८ जून दुपारी १२-३७ वाहन गाढव.
२) आर्द्रा – बुधवार २२ जून सकाळी ११-४२ वाहन मेंढा.
३) पुनर्वसू ( तरणा पाऊस )- बुधवार ६ जुलै सकाळी ११-१० वाहन उंदीर.
४) पुष्य ( म्हातारा पाऊस ) – बुधवार २० जुलै सकाळी १०-४८ वाहन कोल्हा.
५) आश्लेषा ( आसळकाचा पाऊस ) – बुधवार ३ ॲागस्ट सकाळी ९-३७ वाहन मोर.
६) मघा ( सासूंचा पाऊस ) – बुधवार १७ ॲागस्ट सकाळी ७-२२ वाहन घोडा.
७) पूर्वा फाल्गुनी ( सूनांचा पाऊस ) – मंगळवार ३० ॲागस्ट उत्तररात्री ३-१७ वाहन मेंढा.
८) उत्तरा फाल्गुनी ( रब्बीचा पाऊस ) – मंगळवार १३ सप्टेंबर रात्री ९-१४ वाहन गाढव.
९) हस्त ( हत्तीचा पाऊस ) – मंगळवार २७ सप्टेंबर दुपारी १२-४३ वाहन कोल्हा.
१०) चित्रा – सोमवार १० ॲाक्टोबर उत्तररात्री १-४५ वाहन उंदीर.
११) स्वाती- सोमवार २४ ॲाक्टोबर दुपारी १२-१८ वाहन गाढव.

Read more

शनिवारी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

या वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण शनिवार, 30 एप्रिल रोजी चैत्र अमावास्येच्या दिवशी होणार आहे. परंतु ते भारतातून दिसणार नसल्याने ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम येथे पाळण्याची जरूरी नाही असे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.

Read more

मकरसंक्रांतीचा पुण्यकाल दुपारी २ वाजून १८ मिनिटांपासून ६ वाजून २० मिनिटांपर्यंत – दा. कृ. सोमण

 मकर संक्रांतीचा सण उद्या दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत असल्याने साजरा केला जाणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुपारी २ वाजून १८ मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत आहे.

Read more

​कार्तिक पौर्णिमेचं खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही – दा. कृ. सोमण

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

उद्या मध्यरात्री अश्विन पौर्णिमा असल्यानं त्याच दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी करावी – दा कृ सोमण

उद्या मध्यरात्री म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी अश्विन पौर्णिमा असल्यानं त्याच दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी करायची आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

उद्या सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहुर्त – दा. कृ. सोमण

उद्यापासून शारदीय नवरात्रौत्सवाचा प्रारंभ होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवात घरोघरी घटस्थापना होते.

Read more

यावर्षी नवरात्र आठ दिवसांचे – दा. कृ. सोमण

यावर्षी गुरुवार ७ ॲाक्टोबर रोजी नवरात्रारंभ- घटस्थापना आहे. यावर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे आले आहे. आठव्या दिवशी गुरुवारी १४ ॲाक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आहे. त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more