उद्या सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहुर्त – दा. कृ. सोमण

उद्यापासून शारदीय नवरात्रौत्सवाचा प्रारंभ होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवात घरोघरी घटस्थापना होते. उद्या म्हणजे गुरूवारी ७ ऑक्टोबरला आश्विन शुक्ल प्रतिपदा असून आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून म्हणजे ६ वाजून ३२ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत घटस्थापना करावी असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. यंदा नवरात्र हे ९ दिवसांऐवजी ८ दिवसांचंच आहे. उद्या दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनंतर आश्विन शुक्ल प्रतिपदा संपणार असल्यामुळं तत्पूर्वी घटस्थापना करावी असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading