कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे उद्या दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपासून संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांपर्यंत आहे. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे खंडग्रास चंद्रग्रहण आपणास दिसणार नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया खंडाचा अतिपूर्वेकडील प्रदेश, उत्तर पश्चिम यूरोप, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील प्रदेश, संपूर्ण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथून दिसेल. मात्र पुढच्यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.