उथळसर प्रभागात १२ तर मानपाडा-माजिवडामध्ये ११ नवे रूग्ण सापडले

ठाण्यात आज ७७ नवे रूग्ण सापडले तर उथळसर प्रभागात १२ तर मानपाडा-माजिवडामध्ये ११ नवे रूग्ण सापडले.

वर्षातील आजचा दिवस सर्वात लहान तर रात्र सर्वात मोठी

२१ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी आहे. आज सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ झाला आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

महापालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्याचे शासन तसंच उच्च न्यायालयाचे आदेश

ठाणे महापालिकेच्या सर्व सभा प्रत्यक्ष घेण्याचे आदेश शासन आणि उच्च न्यायालयानं दिले आहेत अशी माहिती एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी दिली.

Read more

उद्यापासून उत्तरायणास प्रारंभ – दा. कृ. सोमण

उद्या २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करीत आहे. हीच सायन मकर संक्रांती आहे. याच दिवशी उत्तरायणारंभ आहे. शिशिरऋतूचा प्रारंभ होत आहे. दिनमान १० तास ५७ मिनिटांचे असून रात्रिमान १३ तास ०३ मिनिटांचे आहे. रात्र सर्वात मोठी आहे. या दिवसापासूनच दिनमान हळूहळू वाढत जाणार आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

माजिवडा-मानपाडा मध्ये २१, वर्तकनगर १९ तर उथळसरमध्ये १४ नवे रूग्ण

ठाण्यात आज १०५ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडा मध्ये २१, वर्तकनगर १९ तर उथळसरमध्ये १४ नवे रूग्ण सापडले.

गुडविन ज्वेलर्सचे मालक अकराकरण बंधूंचा जामीन न्यायालयाने फेटाळला

ठाणे,डोंबिवलीसह महाराष्ट्रातील हजारो गुंतवणुकदारांना गंडा घालणाऱ्या गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोघा बंधूंचा जामिन अर्ज शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.व्ही. ताम्हणेकर यांनी फेटाळला.

Read more

केबलवाला असल्याच्या बहाण्याने चोरट्याने लांबवले महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र

केबलवाला असल्याच्या बहाण्याने घरात शिरत चोरट्याने एका घरातील महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना चेंदणी परिसरात घडली.

Read more