इंदिरानगर आणि आजुबाजुचा पाणीपुरवठा आज बंद

इंदिरानगरकडे पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज (गुरूवार) पहाटे चार वाजता ज्ञानेश्वर नगर नाका येथे फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी इंदिरानगरकडे येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, डवले नगर, रूपा देवीपाडा, लोकमान्य नगर, किसन नगर, भटवाडी इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा आज (गुरूवारी) बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

Categories TMC

राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयात रॅगिंग प्रकरणी ०९ विद्यार्थ्यांवर कारवाई

ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयाच्या वसतिगृहात, एमबीबीएसला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्या प्रकरणी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या ०९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या प्रथम व द्वितीयवर्षातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंग करणाऱ्या विदयार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांना एका शैक्षणिक सत्रासाठी कॉलेजमधून … Read more

मलेरियाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे-आयुक्त अभिजीत बांगर

पावसाळा अजून संपलेला नसल्याने अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने अशा ठिकाणांमधून डासांची व्युत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू आहे, पाऊस थांबल्यानंतर देखील पुढचे 15 दिवस हे महत्वाचे असून संपूर्ण ऑक्टोबरपर्यत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क रहाण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

Categories TMC

ठाणे महानगरपालिकेचा ४१वा वर्धापनदिन उत्साहात साजरा ध्वजारोहण, संचलन आणि अभिवादन

ठाणे महानगरपालिकेचा ४१ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक संदीप माळवी आणि प्रशांत रोडे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरिश झळके उपस्थित होते. त्यानंतर, अग्निशमन दल, सुरक्षा दल, एमएसएफ यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन … Read more

Categories TMC

महापालिकेच्या कचरा गाड्या भंडारली ग्रामस्थांनी रोखल्या

कल्याण मधील भंडारली गावात आज महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या अडवण्यात आल्या. ठाणे महापालिकेचा कचरा सध्या भंडारली गावात टाकला जात आहे भंडारी ग्रामस्थांनी यापूर्वीही या प्रश्न आंदोलन केलं होतं त्यावेळी महापालिका आयुक्ताने हा प्रश्न लवकरच सोडण्याचा आश्वासन दिलं होतं पण त्यावरही काही तोडगांना निघाल्यामुळे ग्रामस्थांनी आज कचऱ्याच्या गाड्या गावात येण्यापासून अडवल्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील … Read more

Categories TMC

घरगुती नळ जोडणी धारकांच्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के सूट

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणी बिलावरील प्रशासकीय आकार (दंड किंवा व्याज) पूर्णत: माफ करण्याची अभय योजना ठाणे महापालिकेने जाहीर केली आहे.

Read more

Categories TMC

भंडार्ली डम्पिंग ग्राउंड ३० संप्टेंबर पर्यंत बंद न केल्यास माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांचा २ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

तालुक्यातील चौदा गावातील भंडार्ली डम्पिंग हटवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे चौदा गावातील नागरिकांनी भंडार्ली डम्पिंग हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या ३० संप्टेंबर पर्यंत डम्पिंग ग्राउंड बंद न केल्यास माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी २ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Read more

Categories TMC

दिव्यांगांचे प्रश्न – तीन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण

ठाणे शहरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दिव्यांग स्टाॅलची जागा तथा पत्ता बदलण्यासाठी मागणी करूनही ती बदलण्यास परवानगी न देणे, टी स्टाॅलवाटप प्रक्रियेत पारदर्शकता न आणने, गरजू दिव्यांगांची नाकेबंदी करणे आदी प्रकार ठामपा अधिकाऱ्यांकडून होत आहेत.

Read more

Categories TMC

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने दोन हजार नागरिक बेगर होण्यापासून वाचले

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने दिव्यातील 14 इमारतींवर होणारी कारवाई टळली असून दोन हजार नागरिक बेगर होण्यापासून वाचले आहेत.

Read more

Categories TMC

ठाणे महापालिकेच्या पर्यावरण भिमुख विसर्जन व्यवस्थेत मोठ्या जल्लोषात 6435 गणेश मूर्तींचे विसर्जन

अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ६४३५ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले.

Read more