दिव्यांगांचे प्रश्न – तीन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण

ठाणे शहरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दिव्यांग स्टाॅलची जागा तथा पत्ता बदलण्यासाठी मागणी करूनही ती बदलण्यास परवानगी न देणे, टी स्टाॅलवाटप प्रक्रियेत पारदर्शकता न आणने, गरजू दिव्यांगांची नाकेबंदी करणे आदी प्रकार ठामपा अधिकाऱ्यांकडून होत आहेत. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही कार्यवाही केली जात नसल्याने सर्व दिव्यांग संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून गांधी जयंती ठामपाचे श्राद्ध घालण्यात येणार आहे. ठामपा मुख्यालयासमोर दिव्यांग पिंडदान करून अन्नदानही करण्यात येणार आहे. दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. ठाणे महानगर पालिकेकडून या दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टाॅल देण्यात आले आहेत. मात्र, हे स्टाॅल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टाॅल ठेवण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळेच दिव्यांग सक्षमीकरण योजनेस खिळ बसत आहे. मात्र, चुकीच्या ठिकाणी स्टाॅल असल्याने कमाई कमी खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या स्टाॅल धारक दिव्यांगांना त्यांचा व्यवसाय सुकर व्हावा, अशा ठिकाणी स्टाॅल द्यावेत, किंवा त्यांच्या पत्ता बदलाची मागणी मान्य व्हावी, अशी संघटनेची मागणी आहे. मात्र, पालिका अधिकारी महासभा होत नसल्याने पत्ता बदल करणेस टाळाटाळ करीत आहेत. वास्तविक पाहता, ठाणे पालिकेतील अधिकारी दरमहा महासभा भरवून धोरणात्मक निर्णय घेत आहेत. तरीही केवळ दिव्यांगांच्या बाबतीत अशी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना त्रास दिला जात आहे. त्यामुळेच येत्या दोन ऑक्टोबरला ठामपा मुख्यालयासमोर केशवपन करून ठामपाचे श्राद्ध घालण्यात येणार आहे. तर तीन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, समितीने सांगितले.
दरम्यान, दिव्यांगांच्या रोजगाराचा हा प्रश्न असून पालिका अधिकारी दिव्यांगांवर अन्याय करीत आहेत. या अन्यायाविरोधात सर्व दिव्यांगांनी गांधीमार्गाचा अवलंब करून दोन ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीन केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading