मलेरियाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे-आयुक्त अभिजीत बांगर

पावसाळा अजून संपलेला नसल्याने अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने अशा ठिकाणांमधून डासांची व्युत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू आहे, पाऊस थांबल्यानंतर देखील पुढचे 15 दिवस हे महत्वाचे असून संपूर्ण ऑक्टोबरपर्यत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क रहाण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील आकडेवारी आणि खाजगी लॅबमध्ये झालेल्या चाचण्या यामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. खाजगी लॅबमध्ये एखादा रुग्ण डेंग्यू बाधित रु्ग्ण आढळल्यास आल्यास त्याची दैनंदिन माहिती महापालिकेस कळविले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत त्या त्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱी यांनी शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्स तसेच लॅब यांनी त्यांच्याकडे डेंग्यू, मलेरिया सदृश्य आजाराचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्वरीत त्याची माहिती त्याच दिवशी स्थानिक वैद्यकीय अधिकारी आणि मुख्यालय आरोग्य अधिकारी यांना कळविली जाईल या दृष्टीने त्यांना सजग करावे असेही आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले. आजवरचा डेंग्यू रुग्णसंख्येबाबतचा जो अहवाल प्राप्त झाला आहे, त्यानुसार सी.आर.वाडिया दवाखाना येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विभागातील रुग्णवाढीची कारणे काय आहेत, या ठिकाणी रुग्णांची वाढत आहे, त्या अर्थी डासांची व्युत्पत्ती स्थाने असू शकतात. त्यामुळे डासाची व्युत्पत्ती स्थाने शोधून या ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करुन ती नष्ट करण्यात यावी यासाठी फायलेरिया विभागाचा सहभाग महत्वाचा असून त्यांच्यामार्फत प्रभावीपणे कार्यवाही करण्यात यावी अशाही सूचना आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या. सतत आठ ते दहा दिवस पाऊस झाला आणि त्यानंतरचे आठ दिवस रुग्णवाढीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही या दृष्टीने आपण दक्ष राहणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. महापालिका क्षेत्रातील नागरी आरोग्‌य केंद्र, मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांनी समन्वयाने काम करावयाचे आहे. आयसीयूमध्ये कार्यरत असलेल्या नर्सेसना बेसिक लाईफ सपोर्ट आणि व्हेंटिलेटर हाताळणीबाबतचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणे अत्यंत आवश्यक असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करण्यात यावी. तसेच येत्या तीन महिन्यांमध्ये रुग्णालयातील सर्वच नर्सेसना ही दोन प्रशिक्षणे दिली जातील हे सुनिश्चित असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. तसेच या पाहणी दौऱ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणीही आयुक्तांनी केली. यावेळी या ठिकाणी सेंट्रल मॉनिंटरीग यंत्रणा कार्यान्वित करावीत. तसेच प्रत्येक 10 बेडनंतर नर्सिंग कक्ष उपलब्ध करावा. जेणेकरुन सर्व रुग्णांवर योग्य प्रकारे लक्ष ठेवणे सोईचे होईल अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading