घरगुती नळ जोडणी धारकांच्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के सूट

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणी बिलावरील प्रशासकीय आकार (दंड किंवा व्याज) पूर्णत: माफ करण्याची अभय योजना ठाणे महापालिकेने जाहीर केली आहे. ही अभय योजना ३१ डिसेंबर २०२३पर्यंत लागू राहणार असून त्यानंतर मात्र नळ जोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
जे घरगुती नळ जोडणी धारक ०१ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत थकीत पाणी बील, चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील, अशा घरगुती नळ जोडणी धारकांना त्यांच्या थकीत पाणी बिलावर आकारण्यात आलेला प्रशासकीय आकारात (दंड किंवा व्याज) १०० टक्के सूट दिली जाणार आहे. या धोरणापूर्वी ज्यांनी घरगुती पाणी पुरवठा देयके जमा केली असतील त्यांना ही अभय योजना लागू नाही. तसेच, व्यावसायिक वापरासाठी नळ जोडणी घेतलेल्यांनाही ही योजना लागू नाही. ही अभय योजना ३१ डिसेंबर २०२३पर्यंत लागू राहणार आहे. त्याचा लाभ ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे. तसेच, या अभय योजनेच्या समाप्तीनंतर ०१ जानेवारी २०२४ पासून थकबाकी रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या थकित बिल धारकांची नळ जोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading