ठाणे महानगरपालिकेचा ४१वा वर्धापनदिन उत्साहात साजरा ध्वजारोहण, संचलन आणि अभिवादन

ठाणे महानगरपालिकेचा ४१ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक संदीप माळवी आणि प्रशांत रोडे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरिश झळके उपस्थित होते. त्यानंतर, अग्निशमन दल, सुरक्षा दल, एमएसएफ यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप कदम आणि बाळकूम अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश काकळीज यांनी केले. ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर, नरेंद्र बल्लाळ सभागृहात पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी, परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, वर्षा दीक्षित अनघा कदम, गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, तुषार पवार, शंकर पाटोळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, टीएमटीचे व्यवस्थापन भालचंद्र बेहरे उपस्थित होते . त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयुक्त अभिजीत बांगर यांनी मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच, कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या अभिवादन केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading