सरकारी योजनांच्या लाभार्थींचे देशाच्या विकासात योगदान – विनय सहस्रबुद्धे

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. या विकास लाभार्थींची संख्या वाढल्यावरच प्रत्येक कुटुंबापर्यंत वेगाने विकास पोचू शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रुपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

Read more

शहर विकास विभागातील त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची संजय केळकरांची मागणी

शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, परंतु काही बिल्डरांना नाहक त्रास दिला जातो, हे नुकत्याच अटक केलेल्या ब्लॅकमेलरच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात शहर विकास खात्यातील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

बाळकुम जवळील रस्ता खुला करणार

ठाणे नाशिक हायवेवर साकेत जवळ सुरु असलेल्या हायवे रुंदीकरणाच्या कामामुळे साकेत, रुस्तमजी, राबोडी येथील वाहनधारकाना परतीला मोठा वळसा पडत होता. त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी हायवे अथॉरटिच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत पहाणी दौरा केला.

Read more

पोलीस इमारतींची तातडीने दुरुस्ती करा – संजय केळकर

ठाणे शहरातील पोलीस वसाहतींच्या इमारतींची परिस्थिती गंभीर झाली आहे. तातडीने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी शासनाकडे केली. आमदार संजय केळकर यांनी आज नवीन पोलीस वसाहत क्र. १ ते ६ तसेच इमारत ए, बी, सी या इमारतींची पाहणी करून पोलीस कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, आदी उपस्थित होते. … Read more

सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आश्वासन

राज्यातील सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि गतिमान कामकाज करण्यासाठी योग्य त्या सुधारणा करण्याचं आश्वासन धर्मादाय आयुक्तांनी दिलं आहे.

Read more

ओबीसी आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अयशस्वी झाल्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण

मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अयशस्वी झाल्याच्या निषेधार्थ आणि ह्या तिघाडी राज्य सरकारला बुध्दी नसेल तर त्यांनी किमान मध्यप्रदेश सरकारचे तरी अनुकरण करावे. या सरकारने फक्त वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले असून या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

भाजपाकडून ठाण्यातही शिवसेनेची पोलखोल

मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्यातही भाजपाकडून सत्ताधारी शिवसेनेने पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार आहे.

Read more

महापौर पाणीचोर घोषणांसह महिलांचा महापालिकेवर मोर्चा

सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतून हेतुपुरस्सर लादलेल्या तीव्र पाणी टंचाईविरोधात शेकडो कोपरीवासिय महिलांनी आज महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला.

Read more

ऐतिहासिक टाऊन हॉलचं महापालिकेकडील हस्तांतरण रद्द करण्याची आमदार संजय केळकरांची मागणी

ठाणे महापालिकेच्या शेकडो वास्तू आणि रुग्णालयांची योग्य नियोजनाअभावी दैना उडाली असताना कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण केलेला ऐतिहासिक टाऊन हॉल जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. या हॉलचा पुन्हा डम्पिंग हॉल होऊ नये यासाठी हस्तांतरण रद्द करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून जनतेची लूट

केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे अशी घणाघाती टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more