बाळकुम जवळील रस्ता खुला करणार

ठाणे नाशिक हायवेवर साकेत जवळ सुरु असलेल्या हायवे रुंदीकरणाच्या कामामुळे साकेत, रुस्तमजी, राबोडी येथील वाहनधारकाना परतीला मोठा वळसा पडत होता. त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी हायवे अथॉरटिच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत पहाणी दौरा केला. हायवेला लागून बाळकुमच्या बाजूचा रस्ता बंद होता तो सुरु करण्याचा पर्याय वाहनधारकाना दिलासा देऊ शकतो आणि वाहतूक कोंडी कमी होऊ शकते असे केळकर यांनी पहाणी दौऱ्यावेळी सुचवले. या सूचनेला संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात मुंबई कडून येताना या एकेरी रस्त्याचा वापर करता येईल असे संजय केळकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading