ठाण्यामध्ये पु.ल.देशपांडेंच्या जन्मशताब्दीनिमित्त २६ जानेवारीला शतकोटी पु.ल कार्यक्रमात सलग १६ तास विनोदाचा जागर

अजेय या संस्थेतर्फे महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुलोत्सवात १०० विनोदी अभिवचनांचा नजराणा सादर केला जाणार आहे.

Read more

जगातील १ कोटी लोकांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्याचं स्वप्न – महेश काळे

जगातील १ कोटी लोकांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्याचं स्वप्न आपण पाहत आहोत. यासाठी दीड लाख लोकं एकाच वेळी ऐकतील असा कार्यक्रम करण्याचं आपलं स्वप्न असून इंडियन क्लासिकल ॲण्ड म्युझिक आर्टस् द्वारा ५० हजार मुलांना संगीत शिकवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे अशी आपली स्वप्न असून यासाठीच इंडियन क्लासिकल ॲण्ड म्युझिक आर्टस् ही संस्था सुरू करण्यात आल्याची माहिती लोकप्रिय गायक महेश काळे यांनी दिली.

Read more

पु.लंनी मध्यमवर्गाची कधी खिल्ली उडवली नाही किंवा तेजोभंगही केला नाही – अंबरिश मिश्र

दुस-या महायुध्दानंतर घडलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नयनाने मध्यमवर्ग उदयाला आला. या मध्यम वर्गाचे पु. ल. देशपांडेंनी मातेप्रमाणे सिंचन, संगोपन करून त्यांच्यावर वैचारीक संस्कार केले. या संस्कारासाठी त्यांनी विनोदाचा आधार घेतला. पण असे करताना पु.लंनी मध्यमवर्गाची कधी खिल्ली उडवली नाही किंवा तेजोभंगही केला नाही असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

स्टुडंट ऑफ द इअरचा शानदार सांगता सोहळा

मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार डोळयांसमोर ठेऊन ठाण्यातील क्रिएटीव्हफाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या स्पर्धेचा सांगता सोहळा काल संपन्न झाला.

Read more

ग्रँड कॅन्टाटा -ए म्युझिकल ड्रामा हा विशेष सांगितीक कार्यक्रम संपन्न

रोजच्या धावपळीच्या जीवनात तणावग्रस्त आयुष्यातून उत्तम निरोगी आयुष्य कसं जगावं यासाठी ठाणे महापालिका आणि इंटरनॅशनल युथ फेलोशिप यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ग्रँड कॅन्टाटा -ए म्युझिकल ड्रामा हा विशेष सांगितीक कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला.

Read more

पंडीत राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कारानं शास्त्रीय गायक पंडीत उल्हास कशाळकर यांचा तर राज्यस्तरीय युवा पुरस्कारानं सूज्ञा नाईक यांचा गौरव

संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंडीत राम मराठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणा-या राज्यस्तरीय पंडीत राम मराठे स्मृती पुरस्कारानं प्रसिध्द शास्त्रीय गायक पंडीत उल्हास कशाळकर यांना तर भरतनाट्यम् नृत्यांगना सूज्ञा नाईक यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

Read more

ज्येष्ठ पार्श्वगायक रविंद्र साठे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर अभिनेत्री अलका कुबल यांना गंगा जमुना पुरस्कारानं गौरवण्यात येणार

ज्येष्ठ पार्श्वगायक रविंद्र साठे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणा-या प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांना यावर्षीच्या गंगा जमुना पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

Read more

नाट्यजल्लोषमध्ये १४ लोकवस्त्यांमधील गट एकांकिका सादर करणार

ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या प्रेरणेनं सुरू झालेला वंचितांचा रंगमंच यावर्षी पाचव्या वर्षात पदार्पण करत असून यंदाचा नाट्यजल्लोष सोहळा शनिवार आणि रविवारी कॉम्रेड गोदाताई परूळेकर खुल्या रंगमंचावर होणार आहे.

Read more

सुहास जोशी म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ – अशोक समेळ

सुहास जोशी म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ आहेत असे उद्गार जेष्ठ अभिनेते दिगदर्शक अशोक समेळ यांनी ठाण्यात बोलताना काढले.

Read more

प्रख्यात सूरबहार वादक डॉ. अश्विन दळवी यांच्या वादनाने रौप्य महोत्सवी पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाची सुरूवात

रौप्य महोत्सवी पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाची सुरूवात प्रख्यात सूरबहार वादक डॉ. अश्विन दळवी यांच्या सूरबहार वादनानं झाली.

Read more