ज्येष्ठ पार्श्वगायक रविंद्र साठे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर अभिनेत्री अलका कुबल यांना गंगा जमुना पुरस्कारानं गौरवण्यात येणार

ज्येष्ठ पार्श्वगायक रविंद्र साठे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणा-या प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांना यावर्षीच्या गंगा जमुना पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या रविवारी म्हणजे २३ डिसेंबरला जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं असून या समारोहामध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महेश केळुस्कर, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदीप ढवळ तर प्रसिध्द अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. ठाणे महापालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीच्या वतीनं संगीत, चित्रपट, साहित्य, नाट्य, कला आणि शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणा-या गुणीजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कारानं गौरवलं जातं. यावर्षी स्पष्ट उच्चार, धनगंभीर स्वर आणि भावपूर्ण गायन ही खासियत असणारे तसंच गायन, भजन, अभंग अशा प्रकारात गायन करणारे, पार्श्वगायक रविंद्र साठे यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. ५१ हजार रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांना यंदाचा गंगा-जमुना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्याचप्रमाणे महेश केळुस्कर, प्रदीप ढवळ आणि लक्षवेधी कलाकार शर्मिष्ठा राऊत यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. २१ हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading