ठाण्याच्या तहसिलदारांची वाळू माफियांवर धडक कारवाई

ठाण्याच्या तहसिलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी आणि ठाणे तहसिलदार रेती गट आणि तहसिलदार यांच्या संयुक्त पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. दिवा-शीळ रोडवरील खार्डी येथील खाडीमध्ये आणि बंदरावर वाळू चोरी प्रकरणात कडक कारवाई करून १५ अनधिकृत रेतीचे प्लॉट जेसीबीच्या सहाय्यानं खाडीतच नष्ट करण्यात आले. या प्लॉटमध्ये ७० ते ७५ ब्रास रेतीचा साठा होता. जवळपास १ कोटीहून अधिक रक्कमेच्या मुद्देमालावर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या वेळी ५ सक्शन पंप, ४ मोठ्या बोटी ओहोटीच्या वेळी खाडीतून बाहेर काढता येणं शक्य नसल्यानं पाण्यात बुडवण्यात आल्या. सध्याच्या ९ हजार ९०० रूपये ब्रास याप्रमाणे ७५ ब्रास रेतीच्या साठ्याची किंमत ७ लाख ४२ हजार, ५ लाखांचा एक सक्शन पंप याप्रमाणे २५ लाखांचे सक्शन पंप, प्रत्येकी २० लाख रूपयांप्रमाणे ८० लाखांच्या ४ मोठ्या बोटी असा १ कोटी रूपयांचा मुद्देमाल खाडीच्या पाण्यात बुडवण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading