ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील सायकल प्रकल्पाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील सायकल प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी महापालिका आयुक्त आणि या प्रकल्पाशी संबंधित दोन कंपन्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वाजतगाजत हा प्रकल्प आणला. या प्रकल्पांतर्गत तासाला १० रूपये भाड्यानं सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महत्वाचे बस थांबे आणि ठिकाणाजवळ यासाठी सायकल थांबे उभारण्याकरिता परवानगी देण्यात आली होती. याबाबतचा सर्व खर्च संबंधित कंपनीनं करायचा होता. त्याबदल्यात संबंधित कंपनीला थांब्यावर जाहिरात करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र हे प्रकल्प राबवताना योग्य पध्दत न अवलंबिल्याचं प्रवीण वाटेगावकर यांचं म्हणणं होतं. संबंधित कंपनीला ठेका देताना कोणत्याही प्रकारच्या निविदा मागवण्यात आल्या नाहीत. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कंपनीनं भाड्यानं सायकली देण्याचा ठेका दुस-या कंपनीला दिला. हा भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचा भंग असल्याचं वाटेगावकर यांचं म्हणणं असून त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading