कोणताही आपत्तीत मदत कार्यासाठी तात्काळ सज्ज राहावं – शंभूराज देसाई

जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. जनतेला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. पालकमंत्री श्री. देसाई हे सातत्याने जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून … Read more

सर्वसामान्यांच्या दु:खात धावून जाणारा कार्यकर्र्ता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजची सकाळ उजडली ती एक दुदैवी घटना घेऊनच, दि. 19 जुलैची रात्र इरशाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असतांनी निसर्गाने जणू घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटूंबे ढिगाऱ्याखाली गाढले गेले. हे वृत्तच भयंकर होते.हे वृत्त कळताच सहदर्यी असलेले मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे पहाटे सहा वाजता … Read more

इंडस्ट्री मिट कार्यक्रमांमध्ये 290 उद्योगांबरोबर सामंजस्य करार

देशातील अनेक समस्यांचे मूळ हे बेरोजगारी असून ती दूर करण्यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योगांनी त्यांच्या कारखान्यात, बांधकामाच्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारावे. त्यासाठी राज्य शासन सर्व परवाने देऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा … Read more

कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महाहब’ उभारणीकरिता ५०० कोटी रुपयांची मंजुरी

महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपयांची तत्वत: मंजुरी दिली आहे.

Read more

ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त तीन सुट्टया जाहिर

ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त अतिरिक्त तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत.

Read more

ठाण्यातील जुईली बल्लाळ हिची आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महिला समालोचक म्हणून उत्तम कामगिरी

ठाण्यातील एक पत्रकार जुईली बल्लाळ हिने काल संपलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महिला समालोचक म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.

Read more

संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचं – मुख्यमंत्री

संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.

Read more

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

ठाणे जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना यावर्षी पहिल्यांदा राबवली जात आहे. यापुर्वी या योजनेत केवळ इंधन खर्च देण्यात येत होता मात्र सध्या यंत्रसामग्री आणि इंधन खर्चही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गाळ वाहून नेण्यासाठी अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

Read more

पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read more

‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने’ची अंमलबजावणी लवकरच

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने’ची अमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. या योजनेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यातील गरोदर मातांची नोंदणी, तपासण्या, प्रसूती तसेच प्रसूती झाल्यानंतरची माता आणि बालक यांची काळजी असे या योजनेचे सूत्र आहे. या योजनेच्या तयारीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा घेतला.

Read more