ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त अतिरिक्त तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार 30 ऑगस्ट- नारळी पौर्णिमा रक्षाबंधन, 7 सप्टेंबर – गोपाळकाला आणि 10 नोव्हेंबर धनत्रयोदशी हे दिवस स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले आहेत असे कोकण विभागीय आयुक्त यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.