ठाण्यातील एक पत्रकार जुईली बल्लाळ हिने काल संपलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महिला समालोचक म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. ठाण्यातील पत्रकारितेची ही आणखी मोठी कामगिरी आहे. जुईली बल्लाळ हिने ईएसपीएन तर्फे गेले दोन महिने महिला समालोचक म्हणून कार्यरत होती. विशेष म्हणजे जुईली ही एकमेव महिला समालोचक होती.