पालकमंत्र्यांच्या वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उपाययोजनेनंतरही वाहनांच्या लांबच लांब रांगा- बहुतेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्यानं सर्वत्र वाहतूक कोंडी होत असल्यामुळं पालकमंत्र्यांनी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घाईघाईनं कारवाईचा प्रयत्न केला पण तरीही आज शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी दिसून आली. मुंबई-नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी, ठाणे, आंजूरफाटा ते चिंचोटी तसंच अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा फटका बसला. मुंबई -भिवंडी -नाशिक बाह्यवळण रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत होतं. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. ठाण्याहून भिवंडी-नाशिककडे जाणा-या मार्गांवर लागलेल्या रांगा या बराच वेळ हलल्या नव्हत्या. एकप्रकारे पालकमंत्र्यांनी केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्याचं दिसून आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading