ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटर लॅबमधून तयार झालेला विद्यार्थी भारताचा महान शास्त्रज्ञ होऊ शकेल – दा. कृ. सोमण

भविष्यामध्ये ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटर लॅबमधून तयार झालेला विद्यार्थी भारताचा महान शास्त्रज्ञ होऊ शकेल असा विश्वास खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केला. पुरूषोत्तम पाचपांडे संचालित रोबोटिक लॅबचं उद्घाटन दा. कृ. सोमण यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, आयव्होटी, मशिन लर्निंग, थ्रीडी प्रिटींग, रोबोटिक्स, ड्रोन होम उपकरण, गुगल होप, ॲमेझॉन ॲलेक्सा अशा अत्याधुनिक सुविधा या रोबोटिक लॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रोबोटिक सँडल, बोलणारा आकाशकंदिल, झाडांना पाणी घालणारा रोबोट, घराचे संरक्षण करणारा रोबोट नंदी, वृक्षतोडीला आळा घालणारा रोबोट असे अनेक संशोधन प्रकल्प राबवले आहेत. अधिक माहितीसाठी ९००४१०६७२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading