रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक व्हावीत यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांना आयआयटीमार्फत मार्गदर्शन

ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी महापालिकेने आय.आय.टी. मुंबई यांची नेमणूक केली आहे. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांच्या कामाचे गुणवत्ता मुल्यांकन, गुणवत्ता नियंत्रण, कामे करावयाची पध्दत आणि तांत्रिक बाबींबाबतचे मार्गदर्शन महापालिकेचे अभियंते, ठेकेदार यांना नुकतेच आय.आय.टी.च्या तज्ज्ञामार्फत करण्यात आले.

Read more

‘चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य’- महापालिका आयुक्त

कोरोनाविरोधी लढ्यात आपण थोडेही गाफील राहून चालणार नाही. नागरिक, खाजगी डॉक्टर या सगळ्यांना त्यांचे गांभीर्य पटवून देण्यात महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची आणि तेथील वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात अजिबात हयगय होऊ नये अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे.

Read more

महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा. गणेश चंदनशिवे सादर करणार लोकजागर

महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रवाह आणि लोककला या विषयावर लोकजागराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

विकासकामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि विभागप्रमुखांवर

नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली जात आहे. या कामांचा दर्जा सर्वोत्तम असणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण करण्यात येईल असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले आहेत.

Read more

आरोग्य विभागाने इन्फ्लुएन्झा बद्दल सतर्क राहण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच H3N2 (इन्फ्लुएन्झा) च्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या १५ दिवसात H3N2 (इन्फ्लुएन्झा) च्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. H3N2 (इन्फ्लुएन्झा) ची कोणतीही लक्षणे दिसू लागली तर चाचणीच्या निकालाची … Read more

महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीने पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याची मागणी

ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी समाज विकास विभागाच्यावतीने समाजातील गरजू महिला तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यंदा महिला आणि बालकल्याण समितीच्यावतीने विविध योजनांसाठी उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानं पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशा मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कडे केली आहे.

Read more

महापालिकेचा कोणतीही कर वाढ नसणारा ४ हजार ३७० कोटींचा अर्थ संकल्प सादर

ठाणे महापालिकेचा कोणतीही कर वाढ नसणारा ४ हजार ३७० कोटींचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला.

Read more

सुरक्षारक्षकांनी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्यापूर्ण संवाद साधावा – आयुक्त

रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती जसे रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून असते, त्याचबरोबर अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी काही माहिती विचारल्यास किंवा एखाद्या तपासणीबाबत चौकशी केल्यास ते सांगण्यासही कर्तव्यावरील सुरक्षारक्षक मदत करतात, हीच जबाबदारी अधिक चोखपणे पार पडण्यासाठी नागरिकांशी सौजन्याने कसे बोलावे, त्यांच्याशी कसे वागावे, त्याचबरोबर रुग्णालयात कोणाचा गैरवावर सुरू असेल तर संबंधित व्यक्तीसोबत कशा पध्दतीचे वर्तन करावे याबाबतचे प्रशिक्षण महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना देण्यात आले.

Read more

महापालिकेच्या सहकार्याने तुरुंगातील महिला कैदी आणि महिला पोलीसांची कॅन्सर तपासणी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या सहकार्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Read more

मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींचा पदवीदान तसेच गुणगौरव समारंभ

मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्रथम वर्ष जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी, ऑगस्ट 2022 च्या बॅचचा शपथग्रहण, तृतीय वर्ष विद्यार्थिनींचा पदवीदान तसेच यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.

Read more