मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींचा पदवीदान तसेच गुणगौरव समारंभ

मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्रथम वर्ष जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी, ऑगस्ट 2022 च्या बॅचचा शपथग्रहण, तृतीय वर्ष विद्यार्थिनींचा पदवीदान तसेच यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद नीलिमा सोनावणे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन, प्रमुख अतिथीपद सुरेखा सावंत, अध्यक्ष, ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य शाखा यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनींचे पालक, अन्य संस्थांचे पदाधिकारी, तसेच ठाण्यातील परिचर्या प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य आणि नर्सिंग ट्युटर उपस्थित होते. यावेळी नर्सिंग ट्युटर सुनिता गुरूसाळे यांनी प्रथम वर्ष विद्यार्थिनींना परिचर्या व्यवसायाची शपथ दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते तृतीय वर्ष विद्यार्थिनींना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक आणि गुणवंत विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्राजक्ता मोकल हिला इंदुबाई रामराव जपे उत्कृष्ट विद्यार्थिनी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सत्यवती जळगावकर, फंडामेंटल ऑफ नर्सिंग प्रात्यक्षिक प्रथम हे पारितोषिक शबाना खान हिने पटकावले. तर प्राजक्ता मोकल ही विद्यार्थिनी सुलोचना अय्यर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. नीलिमा सोनवणे यांनी ज्ञान आणि कौशल्य ही परिचर्या व्यवसायाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असून याच्या जोडीला सुसंवाद कौशल्य हेही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे असे सांगितले. सुरेखा सावंत यांनी विद्यार्थिनींनी जी शपथ घेतली आहे त्यातील प्रत्येक शब्दाशी प्रामाणिक राहून काम करणे म्हणजेच उत्कृष्ट परिचारीका असणे असे सांगितले. तर शैलेश्वर यानी संस्थेच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आम्हाला नेहमीच गौरव वाटतो अहे सांगून संस्थेला शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading