महापालिकेचा कोणतीही कर वाढ नसणारा ४ हजार ३७० कोटींचा अर्थ संकल्प सादर

ठाणे महापालिकेचा कोणतीही कर वाढ नसणारा ४ हजार ३७० कोटींचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला. महापालिकेच्या प्रशासकिय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यानुसार २०२२ -२३ चा सुधारीत ४ हजार २३५ कोटी तर २०२३-२४ चा ४ हजार ३७० कोटींचा अर्थसंकल्प महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना सादर केला. महसुली उत्पन्न वाढीकडे लक्ष ठेवुन कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसणारा यंदाचा हा काटकसरीचा वास्तव अर्थसंकल्प आहे. शहराला स्वतंत्र धरणासाठी कोणतीही तरतुद केलेली नसली तरी शहरातील स्वच्छता आणि आरोग्यावर भर देण्यात आला आहे. राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक ‘ठाणेदार’ विराजमान झाल्यानंतर ठाण्याच्या विकासालाही चालना मिळाली असुन याचे प्रतिबिंब ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात उमटले आहे. या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात ” मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना” राबवण्याचे पालिकेने ठरवले आहे. या अंतर्गत सुदृढ बालक – सुदृढ माता हा हेतु अभिप्रेत ठेवला असुन यासाठी तब्बल २५ कोटींची तरतुद अर्थसंकल्पात आहे. महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर भिस्त ठेवली आहे. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन,
प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन, तसेच कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading