महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सीवर लाईन सफाईची कामे करतांना संबंधित सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणारे कंत्राटदार आणि संबंधित महापालिका अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी

महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सीवर लाईन सफाईची कामे करतांना संबंधित सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणारे कंत्राटदार आणि संबंधित महापालिका अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाण्यात अनेकदा नाले किंवा सीवर लाईन सफाई करतांना तेथील गाळ काढणे करिता सफाई कामगारांना नाल्यात किंवा चेम्बर्स मध्ये उतरवले जाते. तेव्हा अनेकदा मानवी मैला असलेली गाळ सफाई कामगारांना हाताने भरावी लागते. ४ मे रोजी ठाणे पूर्व भागात अंडरग्राऊंड गटार सफाई करण्यासाठी कामगारांना चेम्बर्स मध्ये उतरवले गेले. या कामगारांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य दिले नसल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशन तर्फे ठाणे महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी केली आहे. सबंधित सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी सुरक्षा साहित्य तसेच वैद्यकीय विमा आणि जीवन विमा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच सीवर लाईन, चेम्बर्स सफाई करतांना शक्यतो यांत्रिक उपकरणे वापरली जावीत. हाताने मैला उचलण्यासाठी सफाई कामगारांना प्रतिबंध करणे आणि त्यांचे पुनर्वसन कायदा २०१३ या कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी तसंच या कायद्याचे उल्लंघन करणारे कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया
यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading