डवले गाव येथे नायब तहसिलदारासह तलाठ्यावर भुमाफियांचा हल्ला

मुब्र्यांमधील डावले गाव येथे नायब तहसिलदार आणि तलाठ्यावर हल्ला होण्याचा प्रकार घडला. डवले गाव येथे भूमाफियांनी शासकीय भूखंडावर अतिक्रमण करुन दोन तीन मजली इमारत उभारुन त्यात अतिक्रमण केले होते. नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून आणि ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली होती. दोन मजली इमारत पाडल्यानंतर भूमाफियांनी घोळका करुन नायब तहसिलदार दिनेश पैठणकर आणि शीळ तलाठी रोहन वैष्णव यांच्यावर जमाव करुन हल्ला केला. ह्या हल्ल्यात अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली त्यानतंर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर भूमाफियांनी तेथून पळ काढला. नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या सह तलाठ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात तीन भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी डावले गावामधील त्या नागरिकांना एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर ही कारवाई पुर्ण करणार असल्याचे नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. मुब्र्यांतील डावले परिसरात कारवाई करण्यापुर्वी नायब तहसिलदार आणि तलाठ्यानी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती, पोलिसांना येण्यास थोडा उशीर झाल्याने ह्या अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कुठेतरी कल्पिता पिंपळे यांच्या हल्ल्यानंतर अश्या प्रकारे आजही आधिकाऱ्यावर हल्ला होण्याच्या घटना होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच पोलिस प्रशासन अश्या कारवाई वेळेस अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी संक्षम ठरेल का ? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading