जन्म मृत्यू नोंदणीसाठी शासकीय स्थळांचाच वापर करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.

देशात काही ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे बनावट फसवी संकेत स्थळ तयार करून त्यावरून जन्म मृत्यू प्रमाणपत्र अदा करून सर्वसामान्य जनतेचे फसवणूक करणे सुरू आहे. तरीही शासकीय संकेत स्थळांचाचं उपयोग करावा असा आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल आहे. जिल्हास्तरीय जन्म मृत्यू नोंदणी समिती सभा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चर्चेतील विषय अतिशय महत्त्वाचा असून सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने योग्य पावलं उचलली आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. अनेक सार्वजनिक माध्यमातून जन्म मृत्यू प्रमाणपत्राचे वाटपाबाबत लोकांमध्ये अफवा पसरवली जात आहे. खाजगी संस्थांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र कामकाजाची इतर संकेतस्थळ तयार केली आहे. सर्व सामान्य जनतेकडून मोबदला किंवा फी वसूल करून सदर प्रमाणपत्र अदा केली जात आहेत. CRSORGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATHONLINE.COM ह्या संकेतस्थळावरून फसवे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. नागरिकांनी या संकेतस्थळांचा वापर करू नये म्हणून आवाहनाचे सूचना फलक दर्शनी भागात लावण्याबाबत निबंधकांना कळविण्यात आले आहे. शासनाचे crsorgi.gov.in हे संकेतस्थळ वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. कालमर्यादा उलटून गेल्यावर बाळाच्या नावाची नोंदणी करण्याचे राहून जात असल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा २७ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्‍यांनी सांगीतले. कारागृहात जन्म झालेल्या बालक-बालिका यांचे जन्म नोंदवही मध्ये जन्मस्थान कारागृह अथवा तुरुंग असे नमूद न करता ज्या कारागृह अथवा तुरुंगात जन्म झाला आहे त्या शहराचे आणि गावाचे नाव नमूद करावे अशी माहिती देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading