नायब तहसिलदारांची फिल्मी स्टाईलने कारवाई – भुमाफियावर असणार करडी नजर

कासारवडवली मधील ट्रॉपिकल लगून परिसरात शासकीय भूखंडावर अनधिकृतपणे ४० घरांची उभारणी करण्यात आली होती,हि ४० घरे अनधिकृतपणे बांधण्यात आली असून, कलेक्टर लँड वर बांधण्यात आलेल्या ह्या घरांवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. ठाणे नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अश्या कारवाई वेळेस पोलिस यंत्रणा देखील घटनास्थळी असणे अपेक्षित असते मात्र पोलिसांना येण्यासाठी दिरंगाई होत होती. भूमाफियांनी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्याशी वाद करुन कारवाई करण्यास इनकार केला असता यावेळी दिनेश पैठणकर यांनी कुठल्याही प्रकारची माघार न घेता ही कारवाई पुर्ण केली यावेळी पैठणकर यांच्यावर हल्ला होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र ह्या डॅशीग अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी रित्या पुर्ण केली असून सध्या अश्या प्रकारच्या भूमाफियांवर जिल्हा अधिकारी कार्यालयाची करडी नजर असून अश्या कारवाई मुळे भूमाफियावर आळा बसणार असल्याचे नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. या कारवाई वेळी दिनेश पैठणकर, उत्तम शेडगे,तलाठी पाचपाखाडी
,गणेश भूताळे, तलाठी नौपाडा, निलेश कांबळे, तलाठी कळवा, रत्नदीप कांबळे, तलाठी ठाणे, सतिश चौधरी, तलाठी ओवळा, हेमंत गभाले, तलाठी बाळकूम, विजय गडवे, तलाठी चितळसर मानपाडा, सोमा खाकर, तलाठी कोलशेत आणि ठाणे महापालिका अतिक्रमण विभाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील,महेंद्र भोईर आदी अधिकारी उपस्थित होते. सध्या ह्या फिल्मी स्टाईलने केलेल्या कारवाई ची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading