जिल्हा वार्षिक योजनांचा निधी येत्या पंधरा दिवसात संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीमार्फत 2022-23 या वर्षासाठी वार्षिक योजनांअंतर्गत विकास कामांसाठी वितरित करण्यात आलेला निधी संपूर्ण खर्च होईल याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. हा निधी खर्च करताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखली जाईल याचीही खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

Read more

सामूहिक वन हक्क प्राप्त गावांमधील कामांसाठी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत – जिल्हाधिकारी

वनांवर उपजिविका असलेल्या ग्रामीण समाजाला निरंतर आणि  शाश्वत उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी सामूहिक वन हक्क प्राप्त गावांमध्ये ग्रामस्तरीय समिती स्थापन करून त्या भागात कोणकोणती कामे घ्यावीत यासंदर्भातील व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

Read more

मतदार नोंदणी आणि जनजागृतीमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा सन्मान

मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोकण विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा गौरव करण्यात येणार आहे.

Read more

अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्धच्या मोहिमेत दोन बार्ज आणि दोन सक्शन पंपावर कार्यवाही

जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खनन या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच त्यांच्या अधिनस्त असलेल्या तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

Read more

रस्ते अपघात टाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची – जिल्हाधिकारी

अपघात घडण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हे असून अपघात टाळण्याची जबाबदारी एका व्यक्ती किंवा यंत्रणेची नसून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत 11 ते 17 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात आज झाली.

Read more

जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले आई-वडील

जिल्हाधिका-यांच्या दालनात आज एक आगळावेगळा अनौपचारिक असा सोहळा पार पडला. जिल्ह्यातील 16 बालकांना आज एकाच वेळी कायदेशीररित्या पालक मिळाले.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी – जिल्हाधिकारी

निवडणूक आयोगाने कोकण विभाग विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आचारसंहिता लागू

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये द्विवार्षिक निवडणूक घोषित केली आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले आहे.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन – महिलांना मांडता येणार थेट तक्रारी

जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येत्या 6 जानेवारी  रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा जनसुनावणीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्षानिमित्त जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम पौष्टिक तृणधान्याच्या लागवड क्षेत्र वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी

बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्य चांगले रहावे यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या पौष्टिक तृणधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. तसेच ही पौष्टिक तृणधान्ये आणि त्याचे प्रक्रिया केलेले पदार्थ जनतेला सहजरित्या मिळावेत यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

Read more