मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी साधला जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद

आनंदाचा शिधा, शिवभोजन, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी बोनस या योजनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील 35 हुन अधिक लाभार्थी सहभागी झाले होते. यावेळी किसन नगर येथील प्रिती गट्टा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून योजनेची माहिती घेतली. आनंदाचा शिधा मिळाल्याने आमचे सण-उत्सव आम्ही आंनदात साजरे करत आहोत. या योजना अशा पुढेही चालू ठेवाव्यात असं गट्टा यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या बैठकीला जिल्हयातून आनंदा शिधा योजनेचे 15 लाभार्थी, शिवभोजन योजनेचे 11 लाभार्थी, धान उत्पादन शेतकरी प्रोत्साहन राशी बोनस योजनेचे 10 लाभार्थी उपस्थित होते. महिलांना एसटी बसमधून तिकीटामध्ये 50 टक्के सवलत या योजने बद्दल उपस्थित लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित लाभार्थ्यांशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संवाद साधला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading