समतोल सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपट एस टी बस स्थानकातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांना मोफत समतोल आहाराची व्यवस्था

समतोल सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपट एस टी बस स्थानकातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांना या लॉकडाऊन काळात मोफत समतोल आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अनेकदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची जेवणाची गैरसोय होते. सकाळी लवकर घराबाहेर पडल्यामुळे घरून डबा आणणे शक्य होत नाही. त्याच अनूषंगाने समतोल फाउंडेशन वतीने अत्यावश्यक सेवेतील कर्मच्याकरिता मोफत टिफीन सेवा सुरू करण्यात आली असल्याचं फौंडेशनचे विश्वस्त आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. तसंच नोंदणी केलेल्या ५० कर्मचाऱ्यांना ही सेवा पुरविण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर काही जण आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य एकनिष्ठेने पार पाडत आहेत, अशा लोकांना मदतीचा हात म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना मोफत टिफीनची व्यवस्था केली असल्याचे केळकर यांनी सांगितले. यापूर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर यांच्याकरिता जेवणाची तसेच एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केली असून हायवेवरील ट्रक चालकांसाठी ही या संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली आहे. यावेळी खोपट एस टी बस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading