ल्हासनगर आणि ठाणे कामगार हॉस्पिटलचे तातडीने कोव्हिडं हॉस्पिटल मध्ये रूपांतरित कराव

जिल्ह्यातील उल्हासनगर आणि ठाणे कामगार हॉस्पिटलचे तातडीने कोव्हिडं हॉस्पिटल मध्ये रूपांतरित कराव अशी मागणी टिसानं केली आहे. कामगार आणि उदयोजक कोट्यवधी रुपये ESIC ला वर्गणी भरतात.  परंतु जिल्ह्यात कामगारांसाठी कोणतेही कोव्हिडं हॉस्पिटल नाही त्यामुळे उल्हासनगर आणि ठाणे येथील कामगार हॉस्पिटलचे तातडीने कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यास ESIC ला तातडीने सांगावे जेणे करून तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता येईल असे आवाहन ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजे टिसाच्या वतीने केंद्रीय कामगार मंत्री आणि संसदीय कामगार  समिती सदस्य तसेच स्थानिक खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे ह्यांना ट्विटर द्वारे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading