व्हीआयपी लसीकरण कक्ष तात्काळ बंद करण्याचे महापौर आणि महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाण्यात सध्या लसीकरण मोहिम सुरू असून या दरम्यान काही ठिकाणी होणारे व्हीआयपी लसीकरण कक्ष तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौर आणि महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. लसीकरण केंद्रांवर अनेक नगरसेवक तेथील पालिका अधिका-यांच्या मदतीने आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी टोकन घेऊन ठेवतात. नंतर त्यांचे व्हीआयपी पध्दतीनं लसीकरण केलं जातं. लसीकरणासाठी पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना डावलून हे लसीकरण केलं जातं. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हे वादग्रस्त लसीकरण बंद व्हावे आणि लसीकरणास वेग यावा यासाठी महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या काल झालेल्या बैठकीत व्हीआयपी लसीकरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या नगरसेवकांना याबाबत समज द्यावी असंही महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading