सभागृहनेते अशोक वैती यांच्या प्रयत्नानं कोरोनाचं विनामूल्य लसीकरण केंद्र सुरू

ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग १३ काजूवाडी येथे शिवसेना जेष्ठ नगरसेवक आणि सभागृहनेते अशोक वैती यांच्या प्रयत्नानं कोरोनाचं विनामूल्य लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. काजूवाडी परिसरात पालिका शाळा क्र -१३० आणि १३१ मध्ये कोव्हीड वॅक्सीन मोफत लसीकरण केंद्राला मंजुरी मिळाली. १ मार्चपासून जेष्ठ नागरिक आणि कोमॉरबीटी रुग्णांना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ ठाणेकरांना मोफत लसीकरण करण्यासाठी ठाणे पालिका हद्दीत २५ केंद्र सुरु करण्यात आली आहे. मात्र नागरिकांची संख्या अधिक असल्याने केंद्रावर गर्दी होऊ लागली. या निर्धारित लसीकरण केंद्रावरील वाढता ताण पाहता वैती यांनी जेष्ठ नागरिकांची रांगांतून सुटका व्हावी आणि पायपीट होऊ नये म्हणून मोफत जेष्ठ नागरिक आणि कोमॉरबीटी रुग्णांना लसीकरणासाठी केंद्राची मागणी वैद्यकीय विभागाकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर महापालिकेने कोव्हीड वॅक्सीन मोफत लसीकरण केंद्राला मंजुरी देत ४ मार्च रोजी लसीकरण सुरु केले. काजूवाडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच को-मोरबीड पेशंट्स यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैती यांनी केले.काजूवाडी आरोग्य केंद्रा च्या वैद्यकीय अधिकारी मनीषा पवार ह्यांच्या वतीने रामचंद्र शिंदे आणि कदम ह्यांना लस देऊन ह्या मोफत लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading