ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील २४ तास बंद राहणार आहे. शहरातील उथळसर प्रभाग समिती अंतगत कोर्टनाका टाऊन हॉलसमोर भारत गॅस एजन्सी जवळ 450 मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे उद्या सकाळी ९ वाजल्यापासून रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे जेल जलकुंभ, सिध्देश्वर जलकुंभ आणि साकेत जलवाहिनीअंतर्गत परिसरातील चरई, उथळसर, धोबीआळी, राबोडी, जेल परिसर, साकेत कॉम्प्लेक्स, कोर्ट नाका, खारकर आळी, महागिरी, नागसेननगर, सिडको बसस्टॉप इत्यादी परिसराचा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading