शहरातील महत्वाचे रस्ते अडवून प्रचारसभांना परवानगी देऊ नये -सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांची मागणी

शहरातील महत्वाचे रस्ते अडवून प्रचारसभांना परवानगी देऊ नये अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरातील महत्वाचे रस्ते अडवून, वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी करून ध्वनी आणि वायू प्रदूषणास मोकळीक देऊन प्रचारसभांना परवानगी देण्याचे प्रकार गेले काही वर्ष वाढीस लागले आहेत. ठाण्यातील एक डॉक्टर महेश बेडेकर यांनी केलेल्या जनहित याचिकेदरम्यान उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचे स्पष्टपणे उल्लंघन केल्यासारखे वाटते. त्यामुळं रस्ते अडवून प्रचारसभांना परवानगी देणं टाळावं अशी मागणी महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading