होळी-धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांनी केलेल्या विशेष कारवाईत ९२२ तळीरामांवर दंडात्मक कारवाई

होळी-धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांनी केलेल्या विशेष कारवाईत ९२२ तळीरामांवर दंडात्मक कारवाई केली आहे. होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रसंग घडू नये म्हणून ठाणे पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक होलिकोत्सवाच्या जवळ २ पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पोलीसांची गस्ती पथकंही गस्त घालत होती. वाहतूक शाखेनंही नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांवर कारवाई करण्यासाठी विविध नाक्यांवर तपासणी मोहिम राबवली होती. वाहतूक पोलीसांच्या या कारवाईत ९२२ मद्यपि वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तर ट्रिपल सीट जाणा-या १७५ दुचाकी चालकांवर, हेल्मेट नसणा-या ३७ जणांवर, धोकादायक पध्दतीनं वाहन चालवणा-या ११ जणांवर, चुकीच्या मार्गाने गाडी चालवणा-या २७ जणांवर तर इतर नियमभंगांच्या ४९० वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading