वर्तकनगर येथे चिल्ड्रन बस शेल्टरचं उद्घाटन

शाळकरी मुलांसाठी बस शेल्टर उभारण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी प्रत्यक्षात उतरवली असून ही चिल्ड्रन बस शेल्टर्स लहान मुलांचं आकर्षण ठरली आहेत. वर्तकनगर येथे अशाच पध्दतीनं उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन बस शेल्टरचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर उभं राहून शाळेच्या व्हॅनची, बसची वाट पहावी लागते. उन्हाळ्यात, पावसाळ्यात मुलांसह त्यांच्या पालकांचीही मुलं सांभाळताना कसरत होत असते. पावसाळ्यात मुलं अनेकदा भिजतात तर उन्हाळ्यात मुलांना तप्त उन्हात उभं रहावं लागतं. अशा लहान मुलांसाठी ५ बस शेल्टर्स सरनाईक यांनी उभारली आहेत. दोस्ती विहार गृहसंकुल, कोरस नक्षत्र गृहसंकुल, रूणवाल प्लाझा येथे अशी बस शेल्टर्स असून वर्तकनगर आणि डवलेनगर बस डेपोजवळ उभारण्यात आलेल्या बस शेल्टर्सचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading