ठाण्यातील रेहानसिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला

 

ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या निकालात चमकदार कामगिरी केली आहे.
आयसीएसई बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% गुण मिळाले आहेत. आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की, “माझे आई-वडील, आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. आपल्याला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडते. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेतद्वारे देशाची सेवा करणे हे आपले स्वप्न आणि ध्येय असल्याचं रेहान सिंग याने यावेळी सांगितलं. याच शाळेतील शगुन गोयल हिला ९९.२५ टक्के गुण मिळाले आहेत. किमया बहुआ हिने ९९.८० टक्के गुण मिळवले असून तिला टेबल टेनिस तसंच इतर खेळांची आवड आहे. याच शाळेतील यशवर्धन पाटील यानं दहावीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळवले आहेत.

आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की, “माझे आई-वडील, आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडते. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेतद्वारे देशाची सेवा करणे हे माझे स्वप्न आणि ध्येय आहे.”

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading