मासुंदा तलावाचा लवकरच कायापालट होणार

खासदार राजन विचारेंच्या प्रयत्नामुळे लवकरच मासुंदा तलावाचा कायापालट होणार आहे. ठाणे महापालिका आणि खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून संयुक्तपणे मासुंदा तलाव आणि सभोवतालचा परिसर प्रेक्षणीय केला जाणार आहे. काल या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पदपथ सुशोभिकरण, अत्याधुनिक नौकाविहार, डिजीटल चित्रदर्शन, मासुंदा तलावातील शंकर मंदिराचं सुशोभिकरण, अहिल्यादेवी होळकर घाट, खुला रंगमंच, दत्तघाट, ग्लास ट्रान्स्परन्ट गॅलरी आणि पदपथ, नाना-नानी पार्क, सेल्फी पॉईंट, रंगो बापूजी गुप्ते चौक सुशोभिकरण, याबरोबरच अत्याधुनिक आणि आवश्यक विद्युत तसंच उद्यानविषयक विविध कामं केली जाणार आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading