महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली सिग्नल शाळेला भेट

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी काल सिग्नल शाळेला भेट दिली. अमित ठाकरे हे काल ठाणे दौ-यावर होते. आपल्या दौ-यात त्यांनी वेळात वेळ काढून सिग्नल शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली. स्थलांतरित, अत्यंत गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या या शाळेमागचा विचार त्यांनी समजून घेतला. रस्त्यावरून जाणाऱ्या पुलाखालच्या मोकळ्या जागेत थाटलेले अभ्यास वर्ग, प्रयोगशाळा, रोबोटिक लॅब, सिग्नल शाळा बँक आदी विविध उपक्रम भटू सावंत यांच्याकडून जाणून घेतले. तिथे शिकणाऱ्या लहान मुलामुलींशीही गप्पा मारल्या. स्थलांतरित गरीब मुला-मुलींना शिक्षण देण्याचा हा प्रयोग खरोखरच आदर्श आहे. राज्य सरकारने आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात सिग्नल शाळेचा हा प्रयोग एक धोरण म्हणून स्वीकारायला हवा, महानगरांमध्ये राबवायला हवा. तोपर्यंत भटू सावंत यांच्यासारख्या सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील प्रयोगशील कार्यकर्त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकाऱ्यांप्रमाणे समाजानेही भक्कमपणे उभं राहायला हवं असं ते म्हणाले. सिग्नल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिका आणि मोठे व्हा असा आशीर्वाद अमित ठाकरे यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading