देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्याचा ठाण्यात आनंद

देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्याचा ठाण्यात आनंद व्यक्त करण्यात आला. श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तारपा नृत्य करण्यात आलं. द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून आज स्थानापन्न झाल्या आहेत. दिल्लीमध्ये त्या शपथ घेत असताना ठाण्यामध्ये श्रमजीवी संघटनेतर्फे आदिवासींतर्फे आदिवासी नृत्य करून आनंद व्यक्त करण्यात आला. देशाच्या राष्ट्रपती पदी पहिल्यांदाच एखाद्या आदिवासीची निवड झाल्याबद्दल हा आनंद व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading