बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेच्या भूमिकेत बदल

बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेनं पुन्हा आपल्या भूमिकेत बदल केला आहे. बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करावी लागणार आहे. शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी गावातील या जागेवर विविध आरक्षणं असून ही आरक्षणं हटवण्यासाठीचा प्रस्ताव गेल्यावेळी प्रशासनानं महापौरांकडे दिला होता. त्यावेळी महापौरांनी हा प्रस्ताव बाजूला टाकला होता. आता शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती झाल्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीनं या प्रस्तावाच्या विरोधात भूमिका घेण्याचं जाहीर केलं आहे. आमचे सर्व नगरसेवक या प्रस्तावाला विरोध करतील असं शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा शिवसेनेनं भूमिका बदलली असून लोकहिताचा प्रस्ताव नसल्यास शिवसेनेचाही विरोध असेल असं सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading