प्राईड प्रेसिडेन्सीच्या मलनिस्सारण केंद्रात पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची श्रमिक जनताची मागणी

प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरियाच्या मलनिस्सारण केंद्राची सफाई करताना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक जनता संघानं केली आहे. या मलनिस्सारण केंद्राची सफाई सुरू असताना ८ कामगार काम करत होते. त्यापैकी ३ कामगार गुदमरून जागीच मृत्यू पावले. रात्री १२ वाजता अंधारात हे काम करण्याची गरज नव्हती. त्याचप्रमाणे सफाई कामगारांना कोणतीही सुरक्षा साधनं नसताना चेंबरमध्ये उतरवणं चुकीचं होतं. याप्रकरणी कंत्राटदार अजय बागुल यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृत कामगारांना कंत्राटदार आणि महापालिका यांनी संयुक्तपणे नुकसान भरपाई म्हणून तिन्ही कामगारांच्या कुटुंबियांना १ कोटी रूपये द्यावे, रूग्णालयात दाखल असलेल्या कामगारांना वैद्यकीय सहाय्य आणि प्रत्येकी ५० हजार रूपये द्यावे अशी मागणी श्रमिक जनता संघानं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading