न्यायालयामध्ये सोयीप्रमाणे अहवाल देण्यासाठी किराणा बाजार आणि दुकाने मंडळाच्या सचिवास २ लाख रूपये स्वीकारताना रंगेहात अटक

न्यायालयामध्ये सोयीप्रमाणे अहवाल देण्यासाठी किराणा बाजार आणि दुकाने मंडळाच्या सचिवास २ लाख रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. किराणा बाजार मंडळाच्या अखत्यारीत काम करणा-या एका टोळीच्या सभासदाच्या नियुक्तीविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या दाव्यात हवा तसा अहवाल सादर करण्यासाठी सचिव मंगेश झोले यानं ७ लाख रूपये मागितले होते. पण तक्रारदारानं याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रारदार आणि झोले यांच्यात ६ लाखांवर तडजोड करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल झोले यांना २ लाख रूपये स्वीकारताना रंगेहात अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading