ठाण्यातून राजन विचारे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेतर्फे लोकसभेची उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये युती झाली असून पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत दोन्ही पक्षांनी अद्याप तरी पालघरसाठी कोणालाच उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळं पालघर लोकसभा मतदारसंघ नक्की कोणाकडे याबाबत संभ्रम असल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading