जिल्ह्यात होळी उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीनं साजरी

जिल्ह्यात होळी उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीनं साजरी करण्यात आली. यावेळी होळी धुळवड या उत्सवांवर कोणतेही सावट नव्हतं. ना दुष्काळ, ना दहशतवाद, ना पाणी टंचाई यामुळे होळी उत्साहात साजरी झाली. काही ठिकाणी तर होळी पुर्वीच धुळवड साजरी होताना दिसत होती. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लहान-मोठ्या अशा दोन हजाराहून अधिक होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या. ठाण्याच्या लोकमान्य आळीत साजरी होणारी होळी ही शहरातील सर्वात जुनी होळी म्हणून प्रसिध्द आहे. यंदाही ९९वा होलिकोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या चार पिढ्यांपासून तिथे होळी प्रज्वलित करण्यात येत असून पारंपरिक पध्दतीनं पूजाअर्चा आणि नैवेद्य दाखवला जातो. मानवानं यज्ञात दिलेली आहुती अग्नी ज्याप्रमाणे देवदेवतांपर्यंत पोहचवतो त्याचबरोबर वाईट विचार आणि कर्मांचं दहनही करतो अशी समजूत आहे. त्यामुळं होळी पौर्णिमेला होळीचं दहन करण्यात येतं. होळी पौर्णिमेनिमित्त वाईट प्रवृत्ती आणि वाईट विचारांविरोधात विविध ठिकाणी होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading