खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसह केली ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी

वाहनतळाच्या इमारतीची अपूर्ण असलेली कामं लवकरात लवकर मार्गी लावून पहिल्या आणि दुस-या मजल्यावर दुचाकी तर तळमजल्यावर चारचाकी वाहनं उभी करण्याची सोय करावी अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी रेल्वेला केली आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ठाणे रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पाणी जमा झालं होतं. त्याचा त्रास प्रवाशांना झाल्यामुळं खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसह ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली. वाहनतळाचं काम एक महिन्यात पूर्ण करावं, वाहनतळाभोवती असलेला कचरा, राडारोडा हलवून वाहनं येण्याजाण्याकरिता रस्ता मोकळा करावा अशी ताकीद विचारे यांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवर होणारी पाणी गळती त्वरीत थांबवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अडी-अडचणी समजावून घेतल्या. एलफिस्टन सारखी दुर्घटना घडू नये म्हणून कल्याण दिशेकडे असलेल्या जुन्या पादचारी पूलाचं काम लवकर मार्गी लावावं आणि स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ असणारे टी-स्टॉल हटवून रस्ता मोकळा करावा जेणेकरून प्रवाशांना लवकर स्थानकाबाहेर पडता येईल असंही खासदार राजन विचारे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading