अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांवर चप्पल फेकण्याच्या प्रकारानं खळबळ

ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिवान असलेल्या गणेश गायकवाडला शुक्रवारी दुपारी गुप्ता यांच्या न्यायालयात आणण्यात आलं होतं. सुनावणी दरम्यान न्यायाधिशांनी गायकवाडला तुमचा वकील आला आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने न्यायाधिश गुप्ता यांना तुम्हीच मला वकील दिला आहे तो येतच नाही असं प्रत्युत्तर दिलं. त्यावर न्यायमूर्तींनी दुसरा वकील दिला जाईल. पुढच्या तारखेस सुनावणी घेऊ असं सांगितलं. त्यावर संतप्त झालेल्या गायकवाडनं न्यायालयातच शिवीगाळ करून गुप्ता यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. ही चप्पल न्यायाधिशांच्या उजव्या खांद्याला लागली. त्यानंतर न्यायालयातील पोलीसांनी गायकवाडला न्यायालयाबाहेर नेले. पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गणेश गायकवाडवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading