गायमुख चौपाटीचं १५ ऑगस्टला होणार लोकार्पण

गायमुख चौपाटीचं काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या १५ ऑगस्ट पूर्वी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांसह पाहणी केली. गायमुख चौपाटीस शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचा प्रस्ताव आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून येत्या १५ ऑगस्ट रोजी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं उर्वरित कामं पूर्ण करण्याच्या सूचना मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांना त्यांनी दिल्या. या प्रकल्पासाठी किनारा नियमन कायद्याच्या आणि पर्यावरण खात्याच्या परवानग्या मिळवताना खूप अडचण निर्माण झाली होती. आता पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं असून दुस-या टप्प्यातील कामाला सुरूवात झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading